टँकर @ 1000

Foto

औरंगाबाद : जिल्ह्यातील 686 गावे आणि 298 वाड्यांना तब्बल एक हजार टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. अजूनही किमान 18 टँकर प्रस्ताव रांगेत असून येत्या दोन-तीन दिवसात या गावांना टँकर सुरू करावे लागणार आहे. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात विक्रमी टॅंकर संख्या असेल असे बोलले जाते. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रशासन निवडणुकीच्या कामात दंग होते. तरीही जिल्ह्यात टँकरच्या मागणीचे प्रस्ताव वेगाने निकाली काढण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या आठवडाभरात किमान पन्नास नवे टँकर सुरू करावे लागले. सर्वाधिक टँकर औरंगाबाद तालुक्यात सुरू आहेत. तालुक्यातील 123 गावांना गावे आणि 41 वाड्यांना 180 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सिल्लोड तालुक्यात 174, गंगापूर 164, वैजापूर 155, फुलंब्री 91, कन्नड 66, खुलताबाद 38 तर सोयगाव तालुक्यात सात पाणी टँकर सुरू आहेत. जिल्ह्यात अजूनही असंख्य गावांना टँकरची गरज आहे. पाणी टँकर मंजुरीचे अधिकार आता उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. औरंगाबाद तालुक्यात भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. या गावातील नऊ गावे आणि ३ वाड्या टँकरच्या प्रतीक्षेत आहेत. या आठवड्यात या गावांना टँकर सुरू करावे लागतील, असा अंदाज आहे. सिल्लोड तालुक्यातही पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. या जिल्ह्यात तालुक्यातील किमान सहा गावांना याच आठवड्यात टँकरद्वारे पाणी पुरवावे लागेल.  गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातही पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. 

टँकरचा आकडा एक हजार वर 
जिल्ह्यातील टँकरची संख्या आता एक हजार एवढी झाली आहे. अजूनही अजून तब्बल दोन महिने टँकरद्वारे पाणी पुरवावे लागेल. त्यामुळे 30 जून पर्यंत अजून किमान दीडशे टँकर नव्याने सुरू करावे लागतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.